Type Here to Get Search Results !

४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीचा एस.एम देशमुख यांनी घेतलाआढावा

 

४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीचा प्रमुख विश्वस्त एस.एम देशमुख व अध्यक्ष शरद पाबळे यांनी घेतलाआढावा पिंपरी चिंचवड : दि.२६

पिंपरी चिंचवड येथे होणारया मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीचा एस.एम देशमुख यांनी काल आढावा घेऊन समाधान व्यक्त केले..

मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन १९ आणि २० नोव्हेंबर २०२२ रोजी पिंपरी चिंचवड येथे होत आहे..अधिवेशनाची सध्या जोरात तयारी सुरू आहे.. काल एस.एम देशमुख, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी पिंपरी चिचवड येथे जाऊन तयारीचा आढावा घेतला..

परिषदेचे विभागीय सचिव अरूण तथा नाना कांबळे, राज्य निवडणूक प्रमुख बाळासाहेब ढसाळ, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, डिजिटल मिडियाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष सुरज साळवी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी सुरू आहे.. अधिवेशनासाठी विविध १२ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.. प्रत्येक समिती प्रमुखांनी आपल्यावरील जबाबदारीच्या तयारीची माहिती बैठकीत सादर केली.. २००० पत्रकार बसू शकतील अशा वातानुकूलित सभागृहात परिषदेचे हे ऐतिहासिक अधिवेशन होत आहे.. . येणारया पत्रकार प्रतिनिधींची निवास व्यवस्था उत्तम ठेवली जाणार आहे.. पुणे स्टेशन आणि शिवाजी नगर बस स्थानक येथे स्वागत कक्ष उभारण्यात येत असून पाहुण्यांना तेथून निवास व्यवस्थेच्या ठिकाणी घेऊन येण्यासाठी गाड्यांची व्यवस्था असेल.. कार्यक्रम स्थळी आरोग्य कक्ष उभारण्यात येणार आहे..

स्मरणिका दर्जेदार, वाचनीय आणि संग्राह्य व्हावी यासाठी संपादक मंडळाचा प्रयत्न असेल.. रूचकर भोजणाची मेजवाणी पत्रकारांना मिळणार आहे..त्याचा मेनू देखील तयार करण्यात आला आहे.. रात्री मनोरंजनासाठी "महाराष्ट्राची लोकधारा" हा दोन तासांचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे..

दोन दिवसांच्या या अधिवेशनात भरगच्च कार्यक्रम असतील, मुलाखत, चर्चासत्र, आणि तरूण आमदारांच्या माध्यमांकडून अपेक्षा हा परिसंवाद असेल..यामध्ये आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, प्रणिती शिंदे, रोहित पवार आदि आमदारांना निमंत्रित करण्यात येत आहे.. "आम्ही टीव्ही अँकर" या कार्यक्रमात अँकरचे अनुभव ऐकता येणार आहेत..हा सर्व दिमाखदार सोहळा राज्यातील जनतेला पाहता यावा यासाठी सोहळा फेसबुक लाइव्ह केला जाणार आहे.. युट्यूबच्या संपादकांनी देखील आपल्या चॅनेलवरून हा सोहळा लाइव्ह करावा अशी त्यांना विनंती करण्यात येत असून त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.. पत्रकार कक्षातून बातम्या पाठविण्याची सर्व व्यवस्था केली जाणार आहे.. 

अधिवेशनास मान्यवर राजकीय नेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे.. अधिवेशन पत्रकारांचे आहे तर उद्घाटन देखील एका मान्यवर पत्रकाराच्या हस्ते करण्यात येणार आहे.

 कालच्या बैठकीस ५० पेक्षा जास्त पत्रकार उपस्थित होते.. "२०१५ मध्ये पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अधिवेशनापेक्षाही यंदाचे अधिवेशन भव्य दिव्य होईल" याची मला खात्री आहे असा विश्वास एस.एम देशमुख यांनी व्यक्त केला... पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन अधिवेशन होत असल्याबद्दल ही एस.एम देशमुख यांनी आनंद व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies