पुरंदर तालुक्यात मतदान जोमात; साडेतीन वाजेपर्यंत ५०.७५ टक्के मतदान

पुरंदर तालुक्यात मतदान जोमात; साडेतीन वाजेपर्यंत ५०.७५ टक्के मतदान 



पुरंदर :

       पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शनिवारी शांततेत मतदान सुरू आहे. सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत तालुक्यातील विविध गटांमध्ये ८.१० टक्के मतदान झाले होते. अकरा वाजेपर्यंत मतदानाचा टक्का वाढून २१.५१ टक्क्यांपर्यंत, दिड वाजेपर्यंत ३७.५५, त्यानंतर आता साडेतीन वाजेपर्यंत ५०.७५ टक्के पोहोचल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली. 


     तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गटांमध्ये मतदारांचा संमिश्र प्रतिसाद दिसून येत आहे. गराडे गणात सर्वाधिक ५९.७५ टक्के मतदान झाले असून दिवे गणात ५७.९८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. बेलसर गणात ४८.२२, माळशिरस गणात ४९.७, वीर गणात ४९.१३ टक्के मतदान झाले आहे. भिवडी गणात ४६.८२, निरा गणात ४६.९ तर कोळविहिरे गटात ४८.१३ टक्के मतदान झाले आहे.

सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर मतदारांची हळूहळू वाढती गर्दी दिसून येत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिला मतदारांनी सकाळच्या वेळेत मतदान करण्यास प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दुपारनंतर मतदानाच्या टक्केवारी वाढली असुन शेवटच्या सत्रात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाने पात्र मतदारांनी निर्भयपणे व उत्साहाने मतदान करावे, असे आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.