पुरंदरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का

 पुरंदरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का


आमदार विजय शिवतारे यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाचा फटका, राष्ट्रवादी–भाजपची सरशी


सासवड 

पुरंदर तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाने शिवसेनेसाठी चिंताजनक चित्र निर्माण केले आहे. तालुक्याचे आमदार विजय शिवतारे यांना या निवडणुकीत मोठा राजकीय फटका बसला असून, जिल्हा परिषदेत शिवसेनेला खातेही उघडता आले नाही. मागील नगर परिषद निवडणुकीनंतर हा सलग दुसरा मोठा पराभव असल्याने पुरंदरमधील शिवसेनेची पकड सैल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने महत्त्वाच्या गटांवर विजय मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी–भाजपचा दबदबा

तालुक्यातील दिवे–गराडे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली अमोल झेंडे यांनी 21,824 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या विरोधात भाजपच्या दिव्या जगदाळे यांना 7,834 मते मिळाली. झेंडे यांनी तब्बल 13990 मतांची मोठी विजयी आघाडी घेत राष्ट्रवादीचा गड मजबूत केला.

बेलसर–माळसिरस गटात भाजपचे अजय कैलास इंगळे यांनी 7,637 मते मिळवत विजय संपादन केला. काँग्रेसचे दत्ता झुरुंगे यांना 6203 मते मिळाली. इंगळे यांनी 1,434 मतांची आघाडी घेत भाजपची ताकद दाखवली.

वीर–भिवडी गटात भाजपचे हरिभाऊ लोळे यांनी 11,630 मते मिळवत विजय मिळवला. शिवसेनेचे समीर जाधव यांना 11,073 मते मिळाली. या गटात लोळे यांनी अवघ्या 557 मतांच्या फरकाने बाजी मारली.

निरा–शिवतक्रार गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे यांनी 13,521 मते मिळवत विजय मिळवला. शिवसेनेच्या भारती अतुल म्हस्के यांना 7803 मते मिळाली. दुर्गाडे यांनी 5,748 मतांची ठोस आघाडी घेत शिवसेनेला आणखी एक धक्का दिला.

पंचायत समितीत राष्ट्रवादीचे वर्चस्व

पुरंदर पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखत सर्वाधिक जागांवर विजय मिळवला.

वीर गणातून शिवसेनेचे जगताप प्रविण यांनी 5940 मते मिळवत विजय मिळवला. भाजपचे सुधीर धुमाळ यांना 5,791 मते मिळाली. जगताप यांनी 149 मतांची आघाडी घेतली.

दिवे गणात राष्ट्रवादीचे अमित झेंडे यांनी 13,456 मते मिळवत मोठा विजय मिळवला. शिवसेनेचे बाळासाहेब दगडू मगर यांना केवळ 3,320 मते मिळाली. झेंडे यांनी तब्बल 10,136 मतांची विक्रमी आघाडी घेत लक्षवेधी कामगिरी केली.

गराडे गणात राष्ट्रवादीच्या अर्चना कटके यांनी 8,043 मते मिळवत विजय मिळवला. शिवसेनेच्या सुप्रिया रावडे यांना 4,797 मते मिळाली. कटके यांनी 3,246 मतांची आघाडी घेतली.

माळसिरस गणात भाजपचे माऊली यादव यांनी 5424 मते मिळवत विजय मिळवला. शिवसेनेचे शरद यादव यांना 3,538 मते मिळाली. यादव यांनी 1,886 मतांची आघाडी घेतली.

बेलसर गणात शिवसेनेचे माणिक निंबाळकर यांनी 4,807 मते मिळवत विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश कृष्णा जगताप यांना 4,308 मते मिळाली. निंबाळकर यांनी 499 मतांची आघाडी घेतली.

कोळविहिरे गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्मिता निगडे यांनी 5,729 मते मिळवत शिवसेनेच्या शीतल साळुंखे यांचा 1,066 मतांनी पराभव केला.शीतल साळुंखे यांना 4663 मते मिळाली

तसेच निरा–शिवतक्रार गणात राष्ट्रवादीच्या मोनिका कांबळे यांनी 6,109 मते मिळवत भाजपच्या वंदना भोसले यांचा 2168 मतांनी पराभव केला. तर वंदना भोसले यांना 3963 मते मिळाली 


या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेत दोन तर पंचायत समितीत चार जागांवर विजय मिळाला आहे. भाजपला जिल्हा परिषदेत दोन आणि पंचायत समितीत दोन जागांवर समाधान मानावे लागले.

शिवसेनेला मात्र जिल्हा परिषदेत एकही जागा मिळाली नाही, तर पंचायत समितीत केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला.

यामुळे पुरंदरमध्ये आमदार विजय शिवतारे यांचे राजकीय वजन कमी होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले संजय जगताप यांची ताकद वाढताना दिसत असून, राष्ट्रवादीने पुरंदरमधील आपला बालेकिल्ला कायम राखण्यात यश मिळवले आहे.

हा निकाल आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा आणि दिशादर्शक मानला जात आहे.

▪ चौकट

मतमोजणीदरम्यान जिल्हा परिषदेचे उमेदवार गौरव कोलते, अमोल कामठे आणि दत्ता झुरुंगे यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केला होता. मात्र मतांतील फरक मोठा असल्याने निवडणूक विभागाने हे

 अर्ज फेटाळून लावले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.