Friday, September 23, 2022

पुणे येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा स्वागत पर कमानीवर फसले काळे

 पुणे येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा स्वागत पर कमानीवर फसले काळे 



   पुणे दि.२३


पुणे येथील खडकवासला विधानसभा मतदारसंघात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या स्वागत कमानीवर कुणीतरी अज्ञात व्यक्तीने रात्री काळे फासाल्याची घटना समोर आली आहे. धनकवडी येथील अहिल्यादेवी चौकात काळे फासून निर्मला सीतारामन यांचा फोटो खराब करण्यात आला आहे.या प्रकारामुळे या परिसरातील राजकीय वातावरण चांगलं तापले आहे.


     अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपचा गड अधिक मजबूत करण्यासाठी आलेल्या आहेत. त्यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाचे जबाबदारी पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे. पुणे येथील सातारा रस्त्यावरील अहिल्यादेवी चौक येथे आमदार भीमराव तापकीर यांच्या कार्यक्रमानिमित्त गुरुवारी स्वागत कमल लावण्यात आली होती. या फ्लेक्सच्या कमानीवर काही समाजकंटकांनी रात्री काळे बसले आहे. तसेच याबाबत पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नाही  

No comments:

Post a Comment

Featured Post

निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.

 निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.  पुरंदर :       पुरंदर तालुक्यातील निरा कोळविहीरे जिल्हा परिषद ...