पुणे सासवड महामार्गावर शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात,१ ठार ५ जखमी

  

पुणे सासवड महामार्गावर शिवशाही बस आणि  कंटेनरचा भीषण अपघात,१ ठार ५ जखमी  



पुरंदर दि.१९


       सध्या राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. त्यातच आता पुण्यात शिवशाही बस आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. उरुळी देवाची हद्दीतील सासवड येथे हा अपघात झाला असून यात एकजण जागीच ठार झाला आहे तर ५ जण जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सासवड रस्त्यावर उरुळी फाट्यावर असलेल्या गोडाऊनमधून कंटेनर माल भरून निघाला होता. मात्र त्याचवेळी पंढरपूर येथून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या शिवशाही एसटी बस जोरात होती. बस चालकाला चालकाला वेग नियंत्रित करता आला नाही. त्यामुळे बस कंटेनरला जाऊन जोरात धडकली.

या बसची धडक एवढ्या जोरात होती की बसचा पुढच्या भागचा चक्काचूर झाला आहे. याशिवाय कंटनेरचंही मोठं नुकसान झालं. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आणि पाच प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताने काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि बचावकार्य करण्यात आलं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

निरेच्या नगररोडवर ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात. दुचाकीस्वार ठार. दुचाकीवरील पती पत्नी गेले होते मुलाला आश्रमशाळेत भेटायला

नीरा येथील ७५ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू. चारचाकी वाहनाने दुचाकीला पालखी मार्गावर पाठिमागून ठोकरले.