सासवड वीर लोणंद मार्ग वाहतुकीसाठी करण्यात आला बंद

 सासवड वीर लोणंद मार्ग वाहतुकीसाठी करण्यात आला बंद



पुरंदर दि १६



             पुरंदर तालुक्यातील वीर धरणा मधून आज सायंकाळी पाच वाजल्यापासून 43733 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातो आहे. त्यामुळे वीर धरणाच्या लगत नीरा नदीपात्रामध्ये सासवड वीर लोणंद मार्गावर असलेला पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे.... वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस पडतो आहे. पावसाच्या प्रमाणात मोठी वाढ होतेय त्यामुळे वीरधरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात सुद्धा मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वीर धरणामधून मोठ्या प्रमाणात पाणी नीरा नदी पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे वीर धारणा जवळच असलेला पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सासवडहून - वीरमार्गे - लोणंदला जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. लोकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असा पुरंदर तालुका प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.