निर्मला सीतारामन यांनी बारामती येथे घेतला पुरण पोळीचा आस्वाद

 निर्मला सीतारामन यांनी बारामती येथे घेतला पुरण पोळीचा आस्वाद



पुणे दि.२३


      केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रीयन जेवण म्हणजेच पुरणपोळीचा आस्वाद घेतला.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तीन दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. राजकीय वर्तुळात त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. बारामती शहरात भाजप कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी बाळासाहेब गावडे यांच्या निवासस्थानी भोजन केले.



गावडे यांच्या निवासस्थानी साध्या पद्धतीने जेवणाची मेजवानी त्यांना देण्यात आली. महाराष्ट्रीयन जेवणात पुरणपोळीला विशेष महत्त्व आहे. पुरणपोळीसह, मसाले भात, मिरचीचा ठेचा, पुरी पुलावा, बटाटा भाजी, भजी, कोथिंबीरीची वडी, आलू पातळ भाजी, छोला उसळ, साधा भात, वरण, तूप कोशिंबीर आधी पदार्थ जेवणात ठेवण्यात आले होते.



<

Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.