पुरंदरचा पोपट भर सभेत थोबाडात चप्पल खाणार : नाव न घेता हा इशारा कोणाला ?
सासवड दि.२७
पुरंदर तालुक्यातील बहुचर्चित असलेले छत्रपती संभाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा विषय पुन्हा ऐरणीवर आला असून या विमानतळाच्या विरोधासाठी तयार झालेली संघर्ष समिती आक्रमक झाली असल्याचे पहावयास मिळते आहे.
महिलांच्यावतीने "विमानतळाच्या नावाखाली गल्लीबोळात भुंकणारा पोपट लवकरच भर सभेत थोबाडात चप्पल खाणार" अशा कशाचे स्टिकर सध्या सोशल मीडियावर झळकत आहेत.
यामुळे विमानतळ संघर्ष समिती पुन्हा आक्रमक झाली असल्याचे सध्या पाहावयास मिळते. तालुक्यातील काही नेते विमातळाचा आग्रह धरत आहेत त्यामुळे बधितांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागत आहे.
कोणाचे ही नाव न घेता पोस्टर सध्या सोशल मीडियावर झळकत असल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे सभेत चप्पल कोण खाणार ? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे खरंच हा नेता सभेत चप्पल खाणार का?
सध्या सरकारमध्ये असलेल्या आमदारांना देखील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे यातच आमदार संतोष बांगर यांचे प्रकरण ताजे आहे.पुरंदर तालुक्यातील नेत्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार का ? यामुळे माजी आमदारांची व नेत्यांची सुरक्षितता वाढवावी लागण्याची शक्यता आहे.