लाचखोर तलाठ्याला कोर्टाचा दणका; एकावर्षाच्या करावसा बरोबर पंधरा हजारच्या दंड ठोठावला.
बुलढाणा दि.24
तित्रंव येथे घराची नोंद करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शेगावच्या एका तलाठ्याला विशेष सत्र न्यायालयाने एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि १५ हजार रुपये दंड ठोठावला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील तित्रंव येथील चिंतामण पुरुषोत्तम हिंगणे यांनी मार्च २०१६ रोजी एक घर विकत घेतले होते. या घराची नोंद करण्यासाठी शेगाव भाग-२ चे तलाठी सुनील जगन्नाथ ठोंबरे रा. शेगांव यांच्याकडे घर नोंदणीसाठी २३ मे २०१६ रोजी अर्ज केला होता; याव्यवहराची नोंद करण्यासाठी तलाठी सुनील ठोंबरे यांनी चिंतामण हिंगणे यांना तीन हजाराची मागणी केली होती. त्यामुळे चिंतामण हिंगणे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला विभागाच्या पथकाने सापळा रचून तलाठी सुनील ठोंबरे याला शेगाव येथील त्यांच्या कार्यालयात तीन हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली होती.
हे प्रकरणआधिकाचा तपास करून खामगांव येथील विशेष सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी विशेष सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश प्रज्ञा काळे यांच्या समोर झाली. याप्रकरणात एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी चिंतामण हिंगणे, पंच सचिन देशमुख, तपास अधिकारी मंगेश मोहळ, तत्कालीन जिल्हाधिकारी व्ही. एन. झाडे या चौघांची साक्ष नोंदविण्यात आली. यांनतर संशयित आरोपी तलाठी सुनील ठोंबरे याने तीन हजाराची लाच घेतल्याचे सिध्द झाले. त्यामुळे सुनील ठोंबरे याला कलम ७ प्रमाणे एक वर्ष शिक्षा व ५ हजार दंड, व दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा कलम १३ प्रमाणे एक वर्षाची शिक्षा व १० हजार दंड, दंड न भरल्यास २ महिन्याची शिक्षा ठोठावली आहे. याा दोन्ही शिक्षा त्याांनी एकाच वेळी भोगावयाच्या आहेत.