Type Here to Get Search Results !

शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सर्व जागांवर विजय मिळवण्याचा शिक्षक महाविकास आघाडीचा निर्धार

 शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सर्व जागांवर विजय मिळवण्याचा शिक्षक महाविकास आघाडीचा निर्धार



  नीरा दि.२७

           पुरंदर तालुक्यातील शिक्षक सहकरी पतसंस्थेची निवडणूक येऊ घातली आहे. या निमित्ताने तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पतसंस्थेची निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज अनेकाकदून लावला जात आहे. मात्र ही निवडणूक आपण सहज जिंकून आणि सर्व जागांवर विजय मिळवून असा निर्धार सत्ताधारी महाविकास आघाडीच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे


          पुरंदर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून शिक्षकांचे आर्थिक प्रश्न मिटवले जातात.अनेकांना गरजेच्या वेळी ही पतसंस्था उपयुक्त ठरत असते. त्यामुळे तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी ही पतसंस्था अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या पतसंस्थेचे वर सध्या वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या शिक्षक महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. या महाविकास आघाडीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात शिक्षक पतसंस्थेची भरभराट झाली आहे. अनेक महत्त्वाचे निर्णय या काळात घेतले गेले आहेत. चांगल्या प्रकारचा लाभांश सभासदांना देण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या चांगल्या कामाच्या जोरावर आम्ही शिक्षक सोसायटी मध्ये पुन्हा निवडून येऊ. असा विश्वास शिक्षक महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्यावतीने काल दिनांक २६/१०/२०२१ रोजी नीरा येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात रात्री आठ ते दहा दरम्यान एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शिक्षक समितीचे माजी राज्याध्यक्ष नाना जोशी यांचेसह शिक्षक संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दाखवली व आगामी पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे मतदान घेऊन शिक्षक आघाडीचा पॅनल विजय होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून पत संस्थेच्या माध्यमातून आज पर्यंत झालेल्या कामांचा लेखाजोखा मांडत या पत संस्थेच्या कामाचं कौतुक केले. कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारा विना ही पतसंस्था चालवली जात असल्याबद्दल त्यांनी संचालक मंडळावर विश्वास व्यक्त केला आहे..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies