पुरंदर तहसील कार्यालया मधील चंदन चोरी नंतर आता सासवड न्यायालयातील चंदनाचे झाड चोरीला गेल्याचे आले पुढे
सासवड दि..२१
पुरंदर तालुक्यात सध्या चोरांनी पोलिसांना चागलेच नकी नऊ आणल्याचे दिसते आहे.लोकांच्या घरात चोऱ्या करणे असो की, सोसायटीच्या पार्किंग मधील गाडी चोरी करणे असो. आता अशी कामे चोर सहज करू लागले आहेत.या चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस यंत्रणा कुठे तरी कमी पडताना दिसते आहे.आणि म्हणूनच ज्या न्यायालयाच्या दरात सर्व सामान्य लोक न्याय मागायला जातात त्याच न्यायालयाच्या दरात बिंदास्तपणे चोरी होऊ लागली आहे.आता लोकांना न्याय देणारे न्यायालय सुद्धा सुरक्षित राहिले नाही. हेच यातून स्पष्ट होत आहे.कारण सासवडच्या न्यायालयाच्या आवारातून चक्क चंदनाची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
काल तहसील कार्यालया मधुन चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याची घटना समोर आली होती. यानंतर सासवड पोलिसात याबाबत तक्रार सुद्धा देण्यात आली होती. त्याचबरोबर अशाच प्रकारची तक्रार आता सासवड न्यायालयातून सासवड पोलिसांमध्ये देण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, सासवड न्यायालयात काम करणाऱ्या संगीता राजेंद्र तागडे यांनी यांनी सासवड न्यायालयाच्या आवारातील चंदनाचे झाड चोरीस गेल्याची तक्रार सासवड पोलिसात दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक १४/१०/२०२१ रोजी सायंकाळी ६ वा. ते दिनांक २०/१०/२०२१ रोजी सकाळी १०.३० वाजालेच्या दरम्यान सासवड दिवाणी न्यायालय येथून २२०० रुपये किमतीचे एक चंदनाचे झाड, अंदाजे १४
ते १७ फूट उंचीच्या चंदनाच्या झाडाचा ४० सेंटिमीटर रुंदीचा बुंधा ७ फूट उंची असलेले लाकूड कोणीतरी अज्ञाताने चोरून नेले आहे.
यासंदर्भात पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक हिप्परकर करत आहेत