गुळूंचे येथे ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या वापरामुळे चोरीची घटना टळली

 गुळूंचे येथे ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या वापरामुळे चोरीची घटना टळली 

पोलीस पाटलांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेवर संदेश दिल्याने  ग्रामस्थ झाले सावध

  पुरंदर दि.१९

 


              पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथे ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून चोर आल्या संदर्भात सूचना दिल्याने लोक सावध आल्याने चोरीची घटना टळली आहे. याबाबतची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनच्यावतीने देण्यात आली आहे.

               याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरंदर तालुक्यातील गुळूंचे ते आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी पहाटे  २ वाजता  ८ ते ९ जन चोरीच्या उद्देशाने कोयता,कुराड,काठी असे शस्त्र हातामध्ये घेऊन गुळूंचे येथे आले होते.गावातील अक्षय पाटोळे यांना ते दिसले असता चोरांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून शांत राहायला सांगितले. पाटोळे यांनी याबाबतची माहिती गावचे पोलीस पाटील  दीपक जाधव यांना कळवली आणि पोलीस पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600)सर्व गावाला व पोलीस स्टेशनला या बाबतचा संदेश दिला व जेजुरी पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली. त्यामुळे तात्काळ गावकरी सावध झाले.त्याच बरोबर जेजुरी पोलिस स्टेशनची नाईट राउंडची गाडी घटनास्थळी दाखल झाली. आणि संपूर्ण गाव सतर्क झाल्याचे लक्षात येताच,चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व पुढील अनर्थ टळला.

         अपदकालिन काळात लोकांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या संदेश यंत्रणेचा वापर करण्याचं आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी लोकांना केले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..