अजित दादा नाहीत मग पुणे जिल्हा परिषदेमध्ये जनतेने कोणाला दिला?
अजित पवारांच्या निधनानंतरही पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व कायम
५१ जागांवर विजय; मतदारांनी ‘दादांच्या विचारांनाच’ दिला कौल
बारामती:
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांनी भावनिक नव्हे, तर ठाम राजकीय निर्णय घेतल्याचे चित्र समोर आले आहे. गेली अनेक वर्षे अजित पवारांचे पुणे जिल्हा परिषदेवर निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. त्यांच्या निधनानंतरही तोच विश्वास मतदारांनी कायम ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांवर मोठा कौल दिला आहे.
पुणे जिल्हा परिषदेत एकूण ७३ जागा असून बहुमतासाठी ३७ जागांची आवश्यकता होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल ५१ जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा केवळ गाठलाच नाही, तर तो मोठ्या फरकाने ओलांडला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने ७२ जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यापैकी ५१ उमेदवार विजयी झाले आहेत.
‘व्यक्ती गेली, पण विचार जिवंत’ – मतदारांचा संदेश
अजित पवार यांच्या कालीन निधनानंतर पक्षासमोर नेतृत्व, संघटन आणि विश्वास टिकवण्याचे मोठे आव्हान होते. मात्र या निवडणुकीत मतदारांनी अजित पवारांनी दिलेल्या विचारावर, विकासाच्या भूमिकेवर आणि त्यांनी निवडलेल्या उमेदवारांवर प्रचंड विश्वास दाखवला आहे.
ही निवडणूक केवळ जागांची नसून, ‘अजित पवारांच्या विचारांना मिळालेला जनादेश’ म्हणून पाहिली जात आहे.
पक्षनिहाय एकूण स्थिती :
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
लढवलेल्या जागा – ७२ | विजयी जागा – ५१
भारतीय जनता पार्टी (भाजप)
लढवलेल्या जागा – ५८ | विजयी जागा – २०
शिवसेना (शिंदे गट)
लढवलेल्या जागा – ३८ | विजयी जागा – ५
शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
लढवलेल्या जागा – २६ | विजयी जागा – ६
काँग्रेस
लढवलेल्या जागा – २६ | विजयी जागा – ०
राष्ट्रवादी (इतर गट)
लढवलेल्या जागा – ८ | विजयी जागा – १
ग्रामीण भागात विकासकामे, सहकार क्षेत्रातील पकड आणि स्थानिक नेतृत्वाची मजबूत फळी या जोरावर अजित पवारांनी जिल्हा परिषदेत जे वर्चस्व निर्माण केले होते, ते त्यांच्या निधनानंतरही अबाधित राहिले आहे. विरोधकांकडून भावनिक मुद्दे उभे केले गेले असले, तरी मतदारांनी स्थैर्य, विकास आणि परिचित नेतृत्वालाच पसंती दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी केवळ सत्तेची नाही, तर अजित पवारांच्या विचारांना मिळालेल्या विश्वासाची पावती मानली जात आहे. बहुमताच्या ३७ जागांच्या तुलनेत ५१ जागांचा विजय हा जिल्ह्यातील राजकारणाची दिशा ठरवणारा निकाल ठरला आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा