Type Here to Get Search Results !

पुरंदर तहसील कार्यालयात चंदनाची चोरी हाकेच्या अंतरावर पोलिस कस्टडी असतानाही झाली चोरी

 पुरंदर तहसील कार्यालयात चंदनाची चोरी

हाकेच्या अंतरावर पोलिस कस्टडी असतानाही झाली चोरी.


   सासवड दि.२०



    पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तहसील कचेरीतील चंदनाच्या झाडाची कोणीतरी अज्ञाताने चोरी केलीय.तहसील कार्यालयाच्या आत आणि पोलीस कस्टडी अगदीच जवळ असताना ही चोरी झाल्याने आता पोलीस प्रशासना समोर चोरांच मोठे आव्हान निर्माण झाले आहे.तालुक्यात सासवड वाल्हे या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असतानाच आता चोरांची मजल थेट तहसील कार्यालयातील चंदन चोरी पर्यंत गेली आहे.

प्रशासनाच्या ताब्यातील वस्तू सुरक्षित रहात नसतील किंवा अश्या ठिकाणी बेधडकपणे चोरी करण्याची हिम्मत चोर दाखवत असतील तर .तालुक्यातलं कायदा सुव्यवस्था किती लयास गेली आहे हेच यातून स्पष्ट होतंय असा सूर आता लोकांनामधून निघायला लागला आहे.


      संपूर्ण तालुक्याचे महत्त्वाचे कार्यालय हे तहसील कार्यालय असते. याच कार्यालयातून संपूर्ण तालुक्याचा गाडा हाकला जातो पण आता कार्यालयातील झाडे झुडपे सुद्धा आता सुरक्षित राहिली नाहीत. पुरंदरच्या तहसील कार्यालया पाठीमागील बाजूला सेतू सेवा केंद्र ची इमारत आहे. या इमारतीमधील मुख्य लाकडाच्या दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्यांनी चंदनाचे झाड तोडून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चक्क पुरंदरच्या तहसील कार्यालयातच चंदनाची चोरी झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.



      चंदन चोरांनी तर पुरंदर तहसील कार्यालयाच्या आवारातील चंदन चोरून आपली चतुराई दाखवली आहे. आता पोलीस चंदन चोरांचा शोध घेणार का? पोलीस आपली चतुराई दाखवणार का याचीच चर्चा सध्या परिसरामध्ये आहे. या संदर्भात आवधुत गोविंद खैरे यांनी आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सासवड पोलिसात तक्रार दिली असून याबाबतचं अधिकचा तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुजावर करीत आहेत.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies