स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुरंदर तालुकाध्यक्षपदी 'तुषार काकडे' यांची निवड
- जेजुरी दि.१८
पुरंदर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी कोथळे येथील तुषार काकडे यांची निवड करण्यात आली आहे. माजी खासदार,संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी केलेले विविध संघटनात्मक कार्याची व सामाजिक कार्याची दखल घेत जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रकाश भोईटे यांनी केलेल्या शिफारसीनुसार काकडे यांची पुरंदर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक युवक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एकत्र येत आपल्या घामाचे दाम मिळवायला शिकले आहेत.अनेक युवक संघटनेत सामील होत आहेत , येणाऱ्या काळात संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करायचे काम करू असे यावेळी तुषार काकडे यांनी सांगितले.
तुषार काकडे यांच्या निवडीबद्दल जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रकाशभाई भोईटे, शेतकरी नेते सतीश काकडे,बाजार समितीचे संचालक धनंजय भोईटे, शहाजी जगताप, राहुल भोसले, वंदना जगताप तसेच समस्त ग्रामस्थ कोथळे व समस्त शेतकरी वर्गाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.