ऊस वाहतूक बंद ठेवण्यासाठी आपल्याच वाहनांचे नुकसान करू नका. सोमेश्वरचे माजी संचालक व वाहतूकदार विजय थोपटे यांचे आवाहन
नीरा दि.२०
डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे मेटाकुटीला आलेल्या ऊस वाहतूक संघटनेने साखर कारखान्यांकडून ऊस वाहतूक दर वाढवून मिळावा याची मागणी केली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतूकदार संघटनांनी ऊस वाहतुक बंद केली आहे. या संपामध्ये वाहतूकदारांच्या वाहनांचे नुकसान करू नका असे आवाहन विजय थोपटे यांनी केले.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर, माळेगाव, भवानीनगर कारखान्याच्या ऊस तोडणीला सूरवात झाली आहे .मात्र वाढत्या झिजेलाच्या किमती मुळे ऊस वाहतूकदरांनी वाहतूक दर वाढवून देण्याची मागणी केली आहे.मात्र कारखाना प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याने वाहतूकदारांकडून बंद पुकारण्यात आला आहे.हा बंद यशस्वी व्हावा म्हणून संघटनेचे कार्यकर्ते वाहनांचे टायर पंचर करीत आहेत. किंवा हवा सोडून देत आहेत.मात्र यामुळे आपल्याच वाहनांचे नुकसान होत असून हा संप शांततेच्या मार्गाने करण्याचं आवाहन सोमेश्वरचे माजी संचालक व वाहतूक व्यवसायिक विजय थोपटे यांनी आज नीरा येथे माध्यमांशी बोलताना केले आहे. ही वाहने आपलीच आहेत आणि आपल्याच वाहनांचे नुकसान करू नका. अगोदरच वाढत्या डिझेलच्या किमतीमुळे वाहतूकदार मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे त्याला आणखी त्रास देऊ नका. आपल्याच वाहनांचे नुकसान करू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.त्याच बरोबर कारखाना प्रशासनाने देखील वाहतूकदार संघटनांच्या मागणीचा विचार करावा.आणि हा प्रश्न तातडीने सोडवावा असे आवाहन कारखाना प्रशासनाला केले आहे.