जेजुरी येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने कर्ज मेळाव्याचे आयोजन
जेजुरी दि.२२
पुरंदर तालुक्यातलं जेजुरी शहर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आज दिनांक २२ ऑक्टोबर रोजी भव्य कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे रोजगार गेले आहेत. तसेच जेजुरीतील मंदिर गेल्या दोन वर्षापासून बंद असल्या कारणाने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच गेली दोन वर्ष सर्व व्यवसाय ठप्प आहेत. या अनुषंगाने तसेच प्रत्येकाला बँकेत जाऊन कर्ज मिळण्याची माहिती व्यवस्थित मिळत नाही. तसेच कर्जाची पूर्तता करणे व माहिती घेणे शक्य नसते. म्हणून भारतीय जनता पार्टी जेजुरी शहरच्यावतीने कर्ज मेळाव्याचे आयोजन केले होते. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँका तसेच प्रायव्हेट बँका, सहकारी बँका यांनी भाग घेतला,
एसबीआयचे बँक अधिकारी यांच्याशी बोलून तसेच काही अन्य बँकाशी चर्चा करून ५० हजारापासून ते ५० लाखापर्यंत कर्ज देण्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्ज, वाहन कर्ज यांची कागदपत्रे, केवायसी, यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, उद्योग आधार, शॉप ॲक्ट लायसन, बँक स्टेटमेंट, सिबिल रिपोर्ट यांची माहिती घेऊन जे ग्राहक योग्य वाटले त्यांना तात्काळ कर्ज पुरवठा करण्यात आला. यावेळी जयराम देशपांडे' शहराध्यक्ष सचिन पेशवे कार्याध्यक्ष गणेश भोसले विजयाताई भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.