गोवा येथे झालेल्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत वैष्णवी थोपटे प्रथम
नीरा . दि.23
पिंपरे (ता. पुरंदर) येथील वैष्णवी पोपट थोपटे हिने गोवा येथे पारपडलेल्या धावण्याच्या स्पर्धेत ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.वैष्णवी च्या या यशाचं पिंपरे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.वैष्णवी हीची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ही निवड झाली आहे.
अखिल भारतीय खेल महासंघ यांच्यावतीने गोवा येथे धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन आले होते.
या मध्ये वेगवेगळ्या गटात व अंतरा मध्ये ही स्पर्धा पार पडली. राष्ट्रीय पातळीवर ही स्पर्धा भरवण्यात आली होती. यामध्ये ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पिंपरे खुर्द येथील वैष्णवी पोपट थोपटे हिने प्रथम क्रमांक मिळवला. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल पिंपरे खुर्द गावच्या ग्रामस्थांच्या वतीने तिचा आज सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत वैष्णवी थोपटे हिने प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल तिला अखिल भारतीय महासंघाच्या वतीने प्रथम क्रमांकाचे मानपत्र व गोल्ड मेडल देण्यात आले त्याच बरोबर तिची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सुद्धा निवड झाली आहे. तिला आंतरराष्ट्रीय धावपट्टू प्रशिक्षक दिपक गावडे यांनी मार्गदर्शन केले. सोमेश्वरचे माजी संचालक विजय थोपटे यांनी वैष्णवी च्या यशा बद्दल तीच कौतुक केले आहे पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.