Type Here to Get Search Results !

पुणे ग्रामीणच्या २१ पोलीस शिपाई पदासाठी २५ ऑक्टोबर रोजी होणार शारीरिक व मैदानी चाचणी

 पुणे ग्रामीणच्या २१ पोलीस शिपाई पदासाठी २५ ऑक्टोबर रोजी होणार शारीरिक व मैदानी चाचणी


पुणे दि. २३

  

     पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्यावतीने २१ पोलीस शिपाई रिक्त पदाकरिता दिनांक २१/१० /२०२१ रोजी शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात येणार असून शारीरिक व मैदानी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी दिनांक २४/१०/२०२१ रोजी सकाळी ६ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण चव्हाण नगर,पाषाण रोड येथे उपस्थित राहण्याची सूचना पुणे ग्रामीण अधीक्षक यांच्या कार्यालयामार्फत देण्या आलाय आहे.

    त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार मैदानी चाचणी करता उशिरा येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही.आवेदन अर्ज भरताना दिलेला फोटो प्रवेश पत्रावर लाऊन प्रवेश पात्र घेऊन यावे. प्रवेश पत्रा शिवाय मैदानी चाचणी करता कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी शासनाने जारी केलेले आधारकार्ड पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, महाविद्यालय ओळखपत्र , ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणते तरी एक मूळ ओळपत्रक सोबत आणावे. अशी सूचना करण्यात आलेली आहे. उमेदवार व तयांच्या सोबत येणाऱ्या लोकांनी covid-19 च्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.मास्क सॅनिटायझर, शारीरिक अंतर इत्यादी गोष्टींचे पालन करावे. भरती प्रक्रियेदरम्यान मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, प्रतिबंधित वस्तू जवळ बाळगणे प्रतिबंधित आहे .अशा वस्तू उमेदवाराकडे आढळून आल्यास उमेदवार विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. याची नोंद घ्यावी असे सांगितले आहे.दिनांक ३/९/२०२१ रोजी दिलेल्या जाहिरातीत मधील सूचनांची नोंद घ्यावी व त्याचे काटेकोरपणे पालन करावं असं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies