Thursday, October 21, 2021

सासवड मध्ये हातभट्टीची दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

 सासवड मध्ये हातभट्टीची दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

 सासवड दि.२१



    पुरंदर तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या सासवड येथील जेजूरी नाका येथील समद ऑटोमोबाईल्सच्या शेजारी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर उपविभागीय कार्यालय व सासवड पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी सागर जयसिंग माने रा. इंदीरानगर सासवड,ता.पुरंदर,जि.पुणे याचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

     याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या संदर्भात उपविभागीय कार्यालयात पोलीस नाईक सोमेश भगवंतराव राउत यानी सरकार तर्फे फिर्याद दिली आहे .त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार आज दिनांक २१ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजलेच्या सुमारास जेजुरी नाक्यावरील समद ऑटोमोबाईल्सच्या शेजारी हातभट्टीची दारू विक्री करण्यात येत होती. सागर जयसिंग माने रा. इंदीरानगर हा त्याच्या ताब्यातील गावठी हातभटटीची तयार दारू विक्री करीत होता.पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून त्याला पकडे असता त्याच्याकडे 1400 रुपये किमतीची हातभट्टीची दारू आढळून आली.पोलिसांनी त्याच्या विरोधात मुंबई प्रोबिशण अँक्ट. 65(ख) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.



 याबाबतचं अधिकचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कांतोडे करीत आहेत.



No comments:

Post a Comment

Featured Post

निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.

 निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.  पुरंदर :       पुरंदर तालुक्यातील निरा कोळविहीरे जिल्हा परिषद ...