दिवे येथे स्वानंदी शिक्षण उपक्रमांतर्गत कार्यशाळा संपन्न
दिवे दि.२२
पुरंदर तालुक्यातलं दिवे येथे स्वानंदी शिक्षण उपक्रमांतर्गत कार्यशाळा संपन्न झाली आहे.
जिल्हा परिषद पुणे यांचेकडून शैक्षणिक गुणवत्ता विकास दहा कलमी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत स्वानंदी शिक्षण उपक्रमाची कार्यशाळा आज दिनांक २२ आक्टोबर रोजी दिवे येथे पारपडली.
पुरंदर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी . मोहन गायकवाड आणि शिक्षण विस्तार अधिकारी पी.एस.मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवे केंद्राचे आदर्श केंद्रप्रमुख प्रतापराव मेमाणे यांच्या नेतृत्वात स्वानंदी शिक्षण कार्यशाळा शुक्रवारी दिवे येथे पार पडली. स्वानंदी शिक्षण अंतर्गत विद्यार्थ्यांना तणाव विरहित व आनंदी शिक्षण मिळणार आहे. त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होईल. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास चांगल्या पद्धतीने होईल.
या उपक्रमाची चार खंडांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सजगता खंड , गोष्ट खंड, कृती खंड व अभिव्यक्ती खंड अशी ही विभागणी करण्यात आली आहे. हे सर्व खंड आठवडाभरच्या शैक्षणिक नियोजनात ३५मिनिटांच्या तासिकेत घेतले जाणार आहेत. या
उपक्रमामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया तणावरहित, प्रभावी व आनंदी होणार आहे.
यावेळी समन्वयक म्हणून उदय पोमण व राजेंद्र गाढवे यांनी काम पाहिले. विशेष म्हणजे ही कार्यशाळा आनंदी वातावरणात पार पडली