ॲट्रॉसिटी मधील आरोपींना तत्काळ अटक करा अन्यथा शनिवार पासुन ठिय्या आंदोलन करण्याचा ; आर पी आय चे पंकज धिवार यांचा इशारा
10 दिवस उलटून सुद्धा आरोपी अटक नाहीत.
जेजुरी :
पुरंदर तालुक्यातील वाघापूर ता. पुरंदर जि. पुणे येथील मातंग समाजातील अक्षय खवळे व त्याचे सहकारी मित्र व गावातील मुलं , यात्रेत तमाशा समोर नाचत होती. त्यावेळी त्याच गावातील चांगदेव कुंजीर व सुखदेव कुंजीर या दोघा भावांनी या मुलांना नाचण्यास विरोध केला. यावेळी अक्षय खवळे याने सर्वच मुलांना खाली बसण्यास सांगा मग आम्ही पण खाली बसतो. असे म्हणाल्या कारणास्तव त्यांना मारहाण करुण जातीवाचक शिवीगाळ करीत हाकलून देण्यात आले..त्यांनी गाव गुंडांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेला 10 दिवस होऊन सुद्धा पोलिसांनी आरोपीना अटक केले नाही. ठीया आंदोलनाचा इशारा आर पी आय चे पंकज धीवर यांनी दिला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी भोर उपविभाग पुरंदर धनंजय पाटील यांना याबाबतचे एक निवेदन देण्यात आले आहे. सदरच्या आरोपीना शनिवार दिनांक 07/05/2022 रोजी सकाळी 11:00 वाजेपर्यंत अटक झाली नाही तर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सासवड समोर सकाळी 11 वाजल्या पासून ठिय्या आंदोलन करणार आहोत अशी माहिती पुरंदर तालुका आर पी आय चे अध्यक्ष पंंकज धिवार यांनी दिली.