सासवड- जेजुरी मार्गावर कारचा भीषण अपघात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
सासवड दि.१८
पुरंदर तालुक्यातील सासवड जेजुरी मार्गावर आज दिनांक १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ईरटीका कारचा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने यामधील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना किरकोळ दुखापत दुखापत होऊन त्यावरच निभावले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही.
याबाबत प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेली माहीती अशी की,पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथून सासवडकडे निघालेल्या एका ईरटीकाकारला शीवरी या गावाच्या जवळ पुणे पंढरपूर मार्गावर अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. कारचा टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ही कार रस्त्यावरील पुलाच्या कठड्याला घासून पुढे गेली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दैव बलवत्तर म्हणून या कारमधील लोकांना जास्त काही दुखापत झाली नाही . किरकोळ जखमांवर निभावले आहे. या सर्व जखमी प्रवाश्यांना सासवड येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.