छत्रपती शिवाजी महाराजांनी ३००वर्षापूर्वीच आत्ताच्या राज्यघटनेची अम्मल बजावणी केली होती : राजेश काकडे
नीरा येथे ग्रामपंचायत व मराठा महासंघाच्यावतीने साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.
नीरा दि.१९
छत्रपती शिवाजी महाराज हे जनते प्रती जिव्हाळा असलेले राजे होते.त्यानीं ३०० वर्षा पूर्वीच आजच्या राज्य घटनेची अम्मल बजावणी करून.जनतेच राज्य स्थापन केले होते.असे प्रतिपादन नीरा ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेश काकडे यांनी केले.नीरा येथे ग्रामपंचायत व मराठा महासंघाच्यावतीने साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायत कार्यालयात.आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी काकडे बोलत होते.
नीरा येथे आज निरेच्या सरपंच तेजश्री काकडे व उपसरपंच राजेश काकडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य राधा माने,अनंता शिंदे,माधुरी वाडेकर ,वैशाली काळे,राजेश. चव्हाण,मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जेधे, दादा गायकवाड,अमोल साबळे मंगेश ढमाळ, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी यांचे सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना निरेचे उपसरपंच राजेश काकडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षापूर्वीच आपल्या भारताची राज्य घटना आमलात आणून जनतेच राज्य आणलं.त्यांचं राज्य सर्व धर्म समभावाच होत.जनते प्रती प्रेम असलेले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे होते.त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही समाजाला उपयुक्त आहे.