उपसरपंचांच्या आवाहनाला ग्रामस्थांचा प्रतिसाद;

 उपसरपंचांच्या आवाहनाला ग्रामस्थांचा प्रतिसाद;   आज दुपार पर्यंत दीड लाख घरपट्टी नागरिकांनी स्वतःहून भरली



नीरा दि.१६


   थकीत घरपट्टी नेरकर नागरीकांनी जमा करावी असे आवाहन चे उपसरपंच राजेश काकडे यांनी काल दिनांक १५ मार्च रोजी नागरिकांना केले होते  या आवाहनाला प्रतिसाद देत आज नागरिकांनी स्वतःहून ही घरपट्टी भरून आपले सामाजिक जबाबदारी पूर्ण केली. आज दुपारपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय मध्ये दीड लाख रुपये घरपट्टीच्या अनुषंगाने जमा झाले.


     पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नीरा ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा वीज वितरणने  काल दिनांक १५ मार्च रोजी खंडित केला होता. यानंतर नीरा गावचे उपसरपंच राजेश काकडे यांनी वीज बिल भरण्यासाठी ग्रामस्थांनी आपले घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकीत रक्कम भरण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत आज दिनांक  १६ मार्च रोजी दुपार पर्यंत दीड लाख रुपयांची घरपट्टी नागरिकांनी स्वतःहून  ग्रामपंचायत कार्यालयात आणून दिली आहे. 


     अनेक नागरिकांनी स्वतःहून ही पाणीपट्टी आणि घरपट्टी आणून जमा केल्याने  उपसरपंच राजेश काकडे यांनी नागरिकांचे आभार मानले. त्याचबरोबर पुढील काळात नागरिकांनी आपली घरपट्टी स्वतःहून ग्रामपंचायत मध्ये आणून भरावी असे आवाहन त्यांनी केले.या महिन्या अखेर घरपट्टी भरली नाही तर घरपट्टी थकावणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलंय. थकीत घरपट्टी धारक नागरिकांमुळे जे नियमित घरपट्टी भरतात त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. यावेळीही तसेच झाले असे म्हणून राजेश काकडे यांनी नियमित घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांची दिलगिरी सुद्धा व्यक्त केली.  त्याच बरोबर आज हा वीज पुरवठा पूर्ववत करून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याच बरोबर आज  ज्या नागरिकांनी घरपट्टी भरली त्या नागरिकांना उपसरपंच राजेश काकडे, विराज काकडे व ग्रामसेवक मनोज ढेरे यानी गुलाब पुष्प देवून त्यांचं आभार मानले.


Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..