छत्रपतींचा 393 जन्मोत्सव विघ्नहर्ता युवा प्रतिष्ठांन पवार कॉलनी च्या वतीने विविध सामाजिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांच्या आयोजनात साजरा
राख दि.२०
शिवजयंती चे औचित्य साधून राख येथील विघ्नहर्ता युवा प्रतिष्ठान पवार कॉलनी येथील तरुण मंडळाने 18 फेब्रुवारी ला किल्ले अजिंक्यतारा येथून शिवज्योत प्रजवलीत करून विघ्नहर्ता गणेश मंदिरात तिला पूजन करण्यात आलं
दिवसभर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे शिवभक्तांना एकवण्यात आले ,रात्री ठीक 7 वाजता राख आणि नावळी गावतील बालचमुंची शिवचरित्र पर भाषणे झाली...त्याचबरोबर मंडळ दरवर्षी शिवजयंती दिवशी काही ना काही सामाजिक उपक्रम राबवत असतो त्यात यावर्षी मंडळाने कऱ्हा वागज येथील एका मती मंद मुलांच्या आश्रमशाळेस 100 किलो तांदूळ भेट म्हणून वाल्हे पोलीस स्टेशन च्या पोलीस नाईक प्रशांत पवार आणि हेड कॉन्स्टेबल मदने साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.... तसेच शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर करण्यासाठी नाझरे येथील प्रसिद्ध शिवव्याखाते सचिन खोपडे यांनी शिवभक्तांना त्यांच्या विचारांनी मंत्रमुग्ध केले.छत्रपती शिवाजी महाराजांची गारद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली याप्रसंगी गावातील माता भगिनी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते... या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते, तसेच तो यशस्वी होण्यासाठी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय पवार, हनुमंत पवार, आचार्य अत्रे प्रतिष्ठान चे सिनियर क्लर्क शहाजी पवार ,देवाचे पुजारी पोपटराव पवार,मंडळाचे कोषाध्यक्ष विनोद जगताप,गौरव पवार,अभिजित पवार, वेदांत पवार, अनिकेत टेकवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया उपाध्यक्ष गणेश पवार, सौरभ पवार,योगेश पवार,अजित पवार,सतीश चव्हाण,आणि सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले ,सूत्रसंचालन श्री पद्मावती एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीकांत पवार यांनी केले तर उपस्थितांचें आभार श्रीनाथ ग्राफिक्स चे संस्थापक महादेव पवार यांनी मानले.