पिंपरी चिंचवड येथी होत असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनास उपस्थित रहा : भरत निगडे.
पिंपरी चिंचवड येथी होत असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनास उपस्थित रहा : भरत निगडे.
पुरंदर :
दि. १९ व २० नोव्हेंबर रोजी पिंपरी - चिंचवड, पुणे येथे होणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनास पुणे जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी केले आहे.
या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चासत्र, परीसंवाद पत्रकारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्यासह दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मराठी सिनेअभिनेता खा. अमोल कोल्हे यांच्या प्रकट मुलाखतीसह भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. अधिवेशनात मराठीतील लोकप्रिय अँकर्सना भेटण्याची, ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. राज्यातील पत्रकारांसाठी ही पर्वणी आहे. मिलिंद भागवत (न्यूज १८लोकमत), विलास बडे (न्यूज १८ लोकमत), अश्विन बापट ( एबीपी माझा), रेश्मा साळुंखे (झी २४ तास), निकिता पाटील (टीव्ही 9), अनुपमा खानविलकर (झी २४ तास) हे अँकर्स बातमी सादरीकरणातील गंमती – जमती, पत्रकारितेतील अनुभव, पत्रकारितेतील प्रवास यावर विवेचन करणार आहेत. सर्व लोकप्रिय अँकर्स मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनच्या निमित्तानं प्रथमच एकत्र येऊन राज्यातील पत्रकारांशी संवाद साधणार असल्याने ही अधिवेशनास येणाऱ्या पत्रकारांसाठी पर्वणी ठरणार आहे. ‘मी अँकर’ हा कार्यक्रम १९ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस. एम. देशमुख, परिषदेचे विश्वस्थ किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, पुणे विभागीय सचिव अरूण नाना कांबळे, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल बडघुले, सोशल मिडिया प्रमुख सुरज साळवे यांसह पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व सोशल मिडिया परिषदेचे सर्व सदस्य हे अधिवेशन होण्यासाठी परिश्रम घेत असल्याचे निगडे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment