शरद विजय सोसायटीच्या संचालकपदी भानुदास पाटोळे बिनविरोध.
नीरा : दि.१६
कर्नलवाडी येथील शरद विजय विविध कार्यकारी सेवा सोसायटीची संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. १३ संचालकांच्या जागेसाठी ३५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अनु. जाती / जमाती प्रवर्गातून गुळूंचे येथील भानुदास यदू पाटोळे यांच एकमेव अर्ज आल्याने पाटोळेंची निवड जाहीर झाल्याचे पँनल प्रमुख ज्ञानदेव (माऊली) निगडे यांनी दिली.
भानुदास पाटोळे हे शरद विजय वि.वि. सेवा सोसायटीचे संस्थापक संचालक असुन ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सक्रिय सदस्य असुन गुळुंचे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आहेत.