कर्जत येथे मराठी पत्रकार परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्नसरचिटणीस हाजी मन्सुरभाई शेख यांचे उपस्थितीचे आवाहन
कर्जत (अहमदनगर)- मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका अध्यक्षांचा मेळावा आणि आदर्श तालुका, जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा अहमद नगर जिल्ह्यातील कर्जत येथे ७ एप्रिल २०२३ रोजी होत आहे.. या मेळाव्याच्या दिवशीच म्हणजे ७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता मराठी पत्रकार परिषदेची बैठक होणार आहे.. बैठकीस अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, सर्व उपाध्यक्ष, सर्व संघटक, विभागीय सचिव, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच डिजिटल मिडिया परिषदेचे पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, राज्य प्रसिध्दीप्रमूख यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.. कृपया नोंद घेऊन नियोजन करावे. या बैठकीस मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभणार आहे. सर्व विभागीय सचिवांनी परिषदेच्या सभासद नोंदणी व वर्गणीसह आपल्या भागातील जिल्ह्यांचा आढावा सादर करणे आवश्यक आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन परिषदेचे सरचिटणीस हाजी मन्सुरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी केले आहे.