सासवड येथे जमिनीच्या वादातून एकाला काठीने मारहाण
सासवड दि.२३
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे जमीन का घेतली म्हणत एकाला काठीने मारहाण करण्यात आली या प्रकरणी सासवड पोलिसात तक्रार करण्यात आली असून सासवड पोलिसांनी याबाबत भारतीय दंड विधान कलम 324 504 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भातील तक्रार चंदन सखाराम शिंदे राहणार सासवड यांनी दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 23 /11/2022 रोजी आरोपी भगवान एकनाथ पवार यांनी त्यांना काठी मार हन केली . ‘‘तुम्ही आमचे समाजाची जागा विकत का घेतली’’ असे म्हणून शिवीगाळ दमदाटी केली.
याबाबतची फिर्याद त्यांनी दिली असून यासंदर्भात अधिकचा तपास सासवड पोलीस करीत आहे.