सोलापूर : व्यवसायासाठी एमआरआय मशीन विकत घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, असे म्हणून डॉक्टर पत्नीला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी डॉक्टर पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ.ऋचा असे मृत पावलेल्या महिलेचे नाव असून पोलिसांनी डॉ. सुरज भाऊसाहेब रुपनर याला अटक केली आहे. या प्रकरणी ऋषिकेश संजय पाटील (रा. पद्मावती प्लाझा मार्ग, पंढरपूर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वैद्यकीय व्यवसायाकरिता एमआरआय मशीन विकत घेण्यासाठी पत्नी ऋचा हिच्या नावे असलेली पंढरपूर येथील जमिनीवर कर्ज काढून किंवा माहेरच्या लोकांकडून पैसे घेऊन ये, अशी मागणी सतत डॉ.पत्नी कडे कागद पत्रावर सहया कर, नाहीतर तुझे माहेरहून रक्कम आणुन दे म्हणत त्रास सुरु केला. घडलेला प्रकार आई आणि भावाला सांगितला. त्यानंतर त्यांनी दोन तीन दिवसांमध्ये सांगोल्याला येतो असे माहेरच्यानी सांगीतले देखील होते. मात्र, 6 जूनला पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
डॉक्टरचा पत्नीला पैसे आणण्यासाठी त्रास, अखेर संपवली जीवनयात्रा
June 10, 2024
0