मराठा आरक्षणासाठी पुण्यात एकाची आत्महत्या
June 19, 2024
0
पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योद्धा म्हणून ओळख झालेले मनोज जरंगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आंदोलनाला सुरवात केली आहे. त्यात दुसरीकडे ओबीसी समाज देखील आंदोलनाला बसला आहे. हे आंदोलने सुरु असतानाच आता पुण्यातील मराठा समाजाच्या तरुणाने चिठठी लिहून आत्महत्या केली आहे.
शंभू प्रसाद देठे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने लाईव्ह आणि चिठठी लिहून आत्महत्या केली आहे. हा तरुण मूळचा बार्शी येथील राहणारा असून तो पुण्यातील वाघोली परिसरात राहत होता. तिथेच एका खाजगी कंपनीत काम करत होता. त्याच्या आत्महत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठत म्हटले आहे की,
जयोस्तु मराठा,
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे. जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे. धीट रहा.
मला माफ करा.
तुमचाच प्रसाद
अशी चिठठी लिहून त्यांनी आपले जीवन सनोवले आहे. माझ्या आत्महत्याला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख प्रसाद देठे याने केला आहे. देठे याच्यामागे पत्नी, 2 मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबंचा आधार गेला असल्याची भावना त्यांच्या निकटवरतीययांनी व्यक्त केली आहे.