धक्कादायक
पुरंदरमध्ये अल्पवयीन मुलांकडे गावठी कट्टे!पुरंदर : पुरंदर तालुक्यातील जेजुरी मोरगाव रोडवरील रेल्वे उड्डाणपूला शेजारी दुचाकीवर जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलाकडे गावठी कट्टा आढळून आला आहे. पोलिसांनी विचारपूस केली असता हा गावठी कट्टा व मोटारसायकल मित्राची असुन त्यांच्याकडे अजुन एक अशाच प्रकारचा पिस्तुल असल्याचे सांगितल्याने दोघांन विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस नाईक सोमेश भंगवतराव राउत यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलांकडे पिस्तूल आढळून आल्याची फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटलेनुसार सोमेश राऊत हे शुक्रवार दि.२८ जून रोजी सांयकाळी ५.३० वाजताच्या सुमारास जेजुरी गावचे हदीत जेजुरी रेल्वे ब्रिजजवळ विधीसंघर्षित अल्पवयीन बालक संग्राम दत्तात्रय चव्हाण वय १७ वर्षे रा.जवळाअर्जुन (ता. पुरंदर) हा त्याचे ताब्यात बेकायदा बिगरपरवाना २० हजार रूपये किंमतीचे एक सिल्वर रंगाचा लोखंडी, त्याचे हॅन्ड ग्रीपजवळ दोन्ही बाजुला लाल रंगाचे फायबर असलेला पिस्तुल बाळगताना आढळून आला. त्या पिस्तूलवर कोणत्याही कपंनीचा लोगो अथवा मार्क नाही. तसेच यामाहा कंपनीचे मोटारसायकल वरून जात होता. त्याचेकडे पिस्तुलबाबत विचारणा केली असता त्याने सदरचे पिस्तुल हे माझा मित्र चैतन्य सखाराम खैरे रा. खैरवाडी (ता. पुरंदर) याने माझेकडे ठेवणेसाठी दिला असुन, त्याचेकडे आणखीन एक अशाच प्रकारचा पिस्तुल आहे. ही मोटारसायकल देखील त्याचीच असल्यचे सांगितले आहे. म्हणुन दोन विधीसंघर्षित (अल्पवयीन) बालक नाव संग्राम दत्तात्रय चव्हाण वय १७ वर्षे रा. जवळाअर्जुन ता. पुरंदर व चैतन्य सखाराम खैरे रा.खैरवाडी ता.पुरंदर यांच्या विरूध्द कायदेषीर फिर्याद सोमेश राऊत यांनी दिली आहे.