Type Here to Get Search Results !

भामचंद्र डोंगरावर वारकरी विद्यार्थ्यांना टोळक्याकडून मारहाण...! अश्लील चाळे करण्यापासून रोखल्याचे कारण

पुणे : तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर (ता. खेड ) वारकरीपंथाचा अभ्यास करणाऱ्या साधक वारकरी विद्यार्थ्यांना तरुणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वारकरी विद्यार्थ्यांनी या डोंगरावर आलेल्या मुल आणि मुलींना अश्लील चाले करण्यापासून हटकल्याने ही मारहाण करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, वासुली परिसरात असणाऱ्या भामचंद्र डोंगराला संत तुकाराम महाराज यांची अभ्यासभूमी आणि साक्षात्कार भूमी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून साधक या ठिकाणी वर्षानुवर्षे राहून अभ्यास करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी आजही जवळपास ३० ते ४० विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी येथे आहेत. मात्र रविवारी एक तरुण मुलगा आणि मुलगी या ठिकाणी आले होते. त्यानंतर त्या दोघांचे या ठिकाणी अश्लीश चाळे सुरू होते. त्यामुळे तिथे अभ्यास करण्यासाठी आलेल्या कुलदीप शिवगोंडा खोत या अभ्यास करणाऱ्या वारकरी विद्यार्थ्यांने त्यांना हटकले. त्यावर या तरुणाने अभ्यास करणाऱ्या साधकाला शिवीगाळ करत मारहाण केली. तो तरुण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने संध्याकाळी पुन्हा मित्रांना बोलावून त्याला अधिक मारहाण केली. या घटनेत साधक विद्यार्थ्यांचा पाय मोडला असून त्याच्या सोबतच्या एका विद्यार्थ्यांलादेखील जखमी केले आहे. या साधकावर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. या घटनेचा भामचंद्र डोंगर सप्ताह समितीने निषेध केला आहे. या तरुणांच्या टोळक्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. भामचंद्र डोंगर येथे नेहमी तळीराम आणि प्रेमी युगुल वावरत असतात. त्यांच्याकडून यापूर्वी देखील अनेक साधकांना धमकावण्याचे प्रकार घडले आहेत. परंतु आता मारहाण झाल्याने परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. येथे अभ्यास करणाऱ्या वारकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी चार आरोपीना अटक करण्यात आली केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास म्हाळुंगे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रकाश नवले करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies