सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घ्या : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची मागणी
June 10, 2024
0
पुणे : संपूर्ण देशांचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुनेत्रा पवार यांचा यांचा पराभव केला. देशात सर्वात हायव्होल्टेज ठरलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) पराभव झाला. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दणदणीत पराभव केला. अजित पवारांच्या राजकीय कारकीर्दीसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातो. त्यातच पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुनिता पवार यांची राज्यसभेवर निवड करावी दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज पंचविसावा वर्धापन दिवस आहे त्यानिमित्त पुण्यात पक्ष कार्यालयात कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह कार्यकर्ते व दीपक मानकर व राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ठराव मांडण्यात आला
या ठरावाद्वारे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. सुनिता पवार राज्यसभेवर गेल्या तर बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळू शकेल अशी मागणी करण्यात आली आहे.