दौंड तालुक्यात विजेचा धक्का लागून आईवडिलांसह मुलाचा मृत्यू
June 17, 2024
0
पुणे : दौंड तालुक्यातील दापोडी येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यात त्यांची मुलगी वाचली आहे.
सुरेंद्र देविदास भालेकर (वय ४४), पत्नी अदीका सुरेंद्र भालेकर (वय ३८), मुलगा प्रसाद सुरेंद्र भालेकर (वय १७) असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. ते मूळचे सोलापूर येथील राहणारे असून दापोडी येथे राहत आहेत.
याबाबत अधिक माहिती आधी की, भालेराव कुटुंबं हे दापोडी येथील अडसूळ यांच्या खोल्यांमध्ये राहत होते. या खोल्या पत्र्यांच्या होत्या. शेजारीच असलेल्या विजेच्या खांबाने त्याला धक्का बसला असावा अशी शक्यता वर्तवन्यात येत आहे. आज सकाळी ७ च्या सुमारास सुरेन्द्र आंघोळीला गेले होते. टॉवेल टाकत असताना अचानक विजेच्या तारखेला धक्का बसला. त्यांच्या आवाजाने तात्काळ त्यांना वाचवण्यासाठी तात्काळ मुलगा प्रसाद याने धाव घेतली. त्यालाही धक्का बसला त्याचवेळी पत्नी अदीका देखील तत्काळ त्या ठिकाणी आली होती. त्यांना देखील धक्का बसला. चार जणांच्या या कुटुंबातील तीन व्यक्तींना जीव गमावा लागला. कुटुंबप्रमुखासह दोघांचा जीव गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुरेंद्र हे परिसरात बांधकामाची कामे करत होते. मुलगा केडगाव येथील जवाहरलाल विद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. पत्नी गावातील शेतात मजुरीचे काम करत आहे. हे कुटुंब या परिसरात गेल्या पाच वर्षापासून राहत आहे. या हृदय द्रावक घटनेने दौंड तालुक्यात दुःखाचे सावट पसरले आहे.
भालेकरांच्या कुटुंबातील एकमेव मुलगी वैष्णवी (वय १७) कोचिंग क्लासला सकाळीच घराबाहेर पडल्यामुळे तिचा जीव वाचला आहे.