Thursday, June 13, 2024
पक्षातील नवीन नेते त्यांना डावलू पाहतायेत, जयंत पाटील यांच्याबाबत सुनील शेळके यांचे विधान...
पुणे : जयंत पाटील साहेबांसारखे जेष्ठ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षमध्ये आहे याचे आम्हला समाधान आहे. पण काही नक्कीच त्यांच्या मनामध्ये आहे. पक्षामध्ये त्यांना सारख सारख डावलल जाणं त्यांना पक्षातून बाजूला ठेवणं हे पक्षातील काही नवीन नेते करू पहात आहेत. जयंत पाटील साहेबाना हेच सांगणे आहे. राज्याचे अभ्यासू नेते म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. आम्हाला आपल्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. अशी प्रतिक्रिया मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे.
तळेगाव दाभाडे येथे सुनील शेळके यांनी माध्यमाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी सुनील शेळके म्हणाले कि, सुनेत्रा पवार यांची खासदार. पदी निवड होणे ही सर्व वरिष्ठ नेत्यांच्या प्रयत्नांना आलेले यश आहे. तसेच सुनेत्रा पवार यांच्या राज्यमंत्री पदाबाबत पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील, त्यावर मी अधिक बोलणार नसल्याचे शेळके यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ययुवक अध्यक्ष पदासाठी दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना युवक अध्यक्ष करण्यासाठी आग्रही होते. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जवळचे असलेले मेहबूब शेख यांची नेमणूक कायम ठेवल्याने आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष पहायला मिळत आहे. त्यातच जयंत पाटील यांनी आपण काही दिवसांसाठीच प्रदेशाध्यक्ष राहणार असल्याचे सांगितले होते. त्यावर विरोधकांनी म्हणजे अजित पवार गटातील नेत्यानी आपल्याकडे येण्याची विनंती केली आहे. जयंत पाटील यांच्याकडून आम्हाला खुप अपेक्षा असल्याचे शेळके म्हणालेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured Post
महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर, राजकीय हालचालींना वेग
एस. प्रशांत पुणे : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड समोर आली असून, महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी ...
-
पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता? पुरंदर : नीरा बारामती रोड...
-
राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा.. पुरंदर : राख, कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ. शनिवारी रात्री...
-
धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद. पुरंदर : नीरा येथील ...

No comments:
Post a Comment