अंकलीतून माऊलींच्या आश्वाचे आळंदीकडे प्रस्थान
June 18, 2024
0
पुणे : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी आता सुरु होताना पहायला मिळत आहे. राज्याच्या कानकोपऱ्यातून वारकरी अलंकापुरीत दाखल होत आहे. त्यातच संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला ज्या आश्वाना मान असतो ती माऊलींची आश्वाचे अंकलीहून आळंदीकडे आज प्रस्थान झाले आहे.
अंकली येथील राजवाड्यात अश्वाचे पूजन करण्यात आले. श्रीमंत सरदार शितोळे अंकलीकर यांच्या राजवाड्यात श्री देवी अंबाबाईचे दर्शन घेऊन श्रीमंत शितोळे सरदार यांनी ध्वजपूजन करून माऊलींच्या अश्वांनी प्रस्थान करण्यात आले आहे, अशी माहिती अश्व चालक तुकाराम कोळी यांनी दिली आहे.
यावेळी अश्वाची टाळ मृत्युंदूंगाच्या गजरात यावेळी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ज्ञानोबा माउलींच्या जयघोषत यावेळी मिरवणूक काढण्यात आली. माऊलींच्या अश्वांचे नाव हिरा आणि मोती असे असून त्यांचे आळंदी कडे प्रस्थान झाले आहे.
आळंदीत येण्यासाठी राज्यभरातून शेतकरी भाविक आपली शेतीतील कामे आवरून माउलींच्या भेटीची आस मनात ठेवून आळंदीकडे निघाले आहेत. राज्यभरतून वारकरी देहू आणि आळंदीत दाखल होत आहेत. यंदाच्या वर्षी 10 ते 15 लाखापर्यंत वारकरी पालखी सोहळ्यात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. त्यामुळे प्रशासनाकडून देखील तेवढी तयाऱी केली जात आहे. यंदाच्या वर्षीचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे.
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून सर्व पालखी मार्गांवर योग्य उपाय योजनाची सुविधा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदाचा पालखी सोहल्यासाठी वारकरी आळंदीत दाखल होत आहेत.