Saturday, January 24, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी सुरेश जगताप-निगडे; अजित पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

 राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी सुरेश जगताप-निगडे; अजित पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान 



बारामती :

      राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीस अधिक बळ देण्यासाठी पुणे जिल्हा ग्रामीणच्या उपाध्यक्षपदी गुळूंचे (ता.पुरंदर) येथील सुरेश आनंदराव जगताप-निगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी जाहीर केली असून, उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. 


     या नियुक्तीमुळे बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर व खडकवासला ग्रामीण तालुक्यांची महत्त्वाची जबाबदारी सुरेश जगताप-निगडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, संघटना अधिक मजबूत करणे व तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याची महत्त्वाची भूमिका त्यांना पार पाडावी लागणार आहे.

नियुक्तीबद्दल संभाजी होळकर यांनी जगताप-निगडे यांचे अभिनंदन करत त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यावर विश्वास व्यक्त केला. या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष व गुळूंचेचे माजी सरपंच संतोष निगडे, शरद विजय सोसायटीचे माजी व्हाइस चेअरमन दिलीप निगडे, गुळूंचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेश भोईटे, अभय निगडे, राजेंद्र निगडे, अमोल निगडे, मयूर निगडे, मंगेश निगडे, ओंकार निगडे यंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. पुरंदर तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दि

ल्या.

No comments:

Post a Comment

Featured Post

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी सुरेश जगताप-निगडे; अजित पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

 राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी सुरेश जगताप-निगडे; अजित पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान  बारामती :       राष्ट्र...