शिरूर : शिरूर तालुक्यात आठवड्यात सलग कोट्यावधींची ड्रग्ज प्रकरणे पुणे ग्रामीण पोलिसांनी बाहेर काढली असून याची पाळेमुळे शोधणे पोलिसांसमोर खरे आव्हान निर्माण झाले आहे.शिरूर तालुक्याचा उडता पंजाब झालेला असून पोलिस कारवाई कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून युवकांमध्ये नशेली पदार्थांचे सेवन करणे, घातक एम डी पर्यंत मजल गेली आहे.या महिन्यात पुणे ग्रामीण पोलिसांनी पान मसाला मध्ये वापरणारे नशा येणारी बंटा गोळी चे रॅकेट उघडकीस आणले होते.त्या पाठोपाठ शिरूर मध्ये एम डी ची दोन कोटी ची कारवाई करत जप्ती केली होती.यानंतर लगोलग पोलिसांनी सुमारे २० कोटी चे ड्रग्ज जप्त केले आहे.या प्रकरणात खाकी चा अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलिस अंमलदार देखील ताब्यात घेतला आहे.या प्रकरणानंतर एम डी ड्रग ची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरु आहे.एकीकडे निवडणुकीचे वातावरण असताना पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईची चर्चा होत असून आता मूळ सूत्रधार शोधणे, पाळेमुळे शोधून हे रॅकेट उध्वस्त करणे पुणे ग्रामीण पोलिसांसमोर मोठे आव्हान असेल.
युवकांत व्यसनाधिनता प्रमाण अधिक
नशेच्या पदार्थांपैकी एम डी हे ड्रग्ज सर्वात घातक असून शिरूर तालुक्यातील अनेक हायवे वरील गावात युवक याचे बळी ठरत आहेत.शिरूर तालुक्यात असलेली पंचतारांकित वसाहत,प्रत्येकाकडे असलेला पैसा परंतु सहजासहजी उपलब्ध होणारे हे ड्रग्ज यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असून हे थोपवणे,शाळकरी मुले, युवक यांना या व्यसनापासून परावृत्त करणे यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज असल्याचे देखील बोलले जात आहे.
पुणे ग्रामीण पोलीस या ड्रग्ज रॅकेट चा कुठपर्यंत शोध लावणार,मूळ आरोपी सापडतील का याबाबत चर्चा सुरू आहे.

No comments:
Post a Comment