Type Here to Get Search Results !

मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय तरूणाचा, पुण्याच्या वेल्हा तालुक्यातल्या पानशेत धरणात बुडून मृत्यू,


-मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय तरूणाचा, पुण्याच्या वेल्हा तालुक्यातल्या पानशेत धरणात बुडून मृत्यू,भोर दि. 10 

मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय तरूणाचा, पुण्याच्या वेल्हा तालुक्यातल्या पानशेत धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय.वेल्हा तालुक्यातील धिंडली गावात असणाऱ्या रिसॉर्ट परिसरातील, धरणाच्या बॅक वॅाटरच्या पाण्यात पाय घसरून पडल्यानं ह्या तरुणाचा मृत्यू झालाय.मोहीत हेमंत सराफ असं मृत्यू झालेल्या 30 वर्षीय संगणक अभियंत्याचे नावय.14 तासांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आलय.


वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणाजवळच्या धिंडली  येथील एका रिसॉर्टच्या परिसरातील धरणाच्या बॅक वॅाटरच्या पाण्यात मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय संगणक अभियंत्याचा पाय घसरून पडून मृत्यू झाला आहे. 

मोहीत हेमंत सराफ (वय-३०) राहणार घर नं. ६९, लक्ष्मीगल्ली कुठीर, लक्ष्मीपुरा, वार्ड-सागर, राज्य-मध्यप्रदेश असे युवकाचे नाव असून बाणेर येथील एका खासगी आय. टी. कंपनीच्या मीटिंगसाठी तो पुण्यात आला होता. ७ एप्रिल दुपारी तीन वाजता मीटिंग संपल्यानंतर कंपनीतील मुले आणि मुली यांचा ग्रुप पानशेत धरणाजवळील धिंडली (ता. वेल्हे) येथील आर्यावत रिसॉर्टवर कॅम्पिंगसाठी आला होता.


 दरम्यान सायंकाळी ५.३० वाजता सर्व जण रिसोर्टवर पोहचले रिसोर्ट फिरल्यानंतर मित्रांसह सर्वजण पानशेत धरणाचे बॅकवॅाटर पाहण्यासाठी पायी चालत गेले. धरणाच्या बॅंकवॅाटरच्या पाण्यात गुडघाभर पाण्यात सर्वजण गेले. यावेळी मोहीम सराफ हा पाय घसरुन खोल पाण्यात पडला.त्यावेळी निखिल किशोर बडगुजर हा देखील पाण्यात पडला. परंतु, जमिनीजवळ असलेल्या दगडाला धरुन तो वर आला. नंतर मोहीतला काढण्यासाठी सर्वजणांनी साखळी तयार केली. सर्वांनी मोहीतला पाण्यातुन वर काढण्याचा खुप प्रयत्न करत असताना अनशुल अमेठा हा सर्वात पुढे होता त्याचा देखील पाय घसरु लागल्याने सर्वजण घाबरुन पाण्याच्या बाहेर आले. यावेळी मोहीत सराफ हा खोल पाण्यात बुडाला. कोणालाही पोहता येत नसल्याने त्याचे प्राण वाचवु शकले नाहीत.


पाण्यात पडलेल्या युवकाचा १४ तासाच्या शोध मोहिमेनंतर आज सकाळी नऊच्या दरम्यान मृतदेह मिळून आला असल्याची माहिती पानशेत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यानी दिली. 

यावेळी मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती व्यवस्थापक अध्यक्ष प्रमोद बलकवडे, रुशीकेश शिवतरे, तानाजी भोसले, हनुमंत नवले, आबाजी जाधव, राजू प्रधान, निखील, यांनी मदतकार्य केले.


वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पानशेत पोलीस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक महेश कदम, पोलीस हवालदार पंकज मोघे, राजाराम होले अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies