Type Here to Get Search Results !

चंदुकाकांची परंपरा कुटुंबाने पुढे चालविली.                   

 चंदुकाकांची परंपरा कुटुंबाने पुढे चालविली:रदार कुलतारसिंग संधवान

    चंदुकाका जगताप स्मृती छाया स्मारकाचे  लोकार्पण.    



सासवड दि.१३                                     

           सहकार रत्न स्व.चंदूकाका जगताप यांच्या विकासाची आणि जनसेवेची परंपरा त्यांच्या कुटुंबाने पुढे चालविली. या कुटुंबाला उज्वल भवितव्य आहे. चंदूकाकांच्या कर्तृत्वाची धमक, जिद्द आणि चिकाटी या जोरावर त्यांनी  32 किमी वरून पिण्याचे पाणी आणून फार मोठे काम केले आहे,अशा शब्दांत पंजाबचे विधानसभा अध्यक्ष सरदार कुलतार सिंग संधवान यांनी चंदुकाका जगताप यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.                                            

             दिवंगत लोकनेते सहकाररत्न चंदूकाका जगताप यांच्या 73 व्या जयंतीनिमित्त शनिवारी सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्मारकातील स्व.जगताप यांच्या 10 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच जीवन कार्य व प्रवासातील विविध प्रसंगाबाबतची छायाचित्रांसह माहिती  'चंदुकाका जगताप स्मृति छाया स्मारक',चंद्रानंद सभागृह आणि शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या सीबीएसई विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सरदार कुलतार सिंग यांच्या हस्ते झाले .याप्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार गजानन कीर्तिकर, खासदार सुप्रिया सुळे, आनंदी काकी जगताप,राजेंद्र जगताप,आमदार संजय जगताप, राजेंद्र मोगल पाटील,डाॅ.अस्मिता जगताप,राजवर्धिनी जगताप,अर्चना संजय मोरे, सोनाली सिद्धार्थ शिंदे यांसह काकांचे कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण करण्यात आले आणि जनक नावाने प्रकाशित होत असलेल्य स्मरणिकेचे अनावरण त्याचप्रमाणे भारतीय डाक विभागाच्या अंतर्गत सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 1हजार  मुलींच्या पॉलिसीचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले.         

            आमदार संजय जगताप यांनी चंदूकाकांची शिस्त, संस्कार,आदरयुक्त भीती, अथक परिश्रमाची शिकवण अशा आठवणींना उजाळा दिला.सहकारी, शैक्षणिक,सामाजिक संस्थात्मक कामाचा आढावा घेत मान्यवरांचे स्वागत केले. तर सनदी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी प्रास्ताविकातून स्व.चंदूकाका जगताप यांची सुरुवातीपासूनची कौटुंबिक माहिती,स्वभाव, संघर्ष, जिद्द आदी विविध पैलूंवर बोलत जीवनप्रवास उलगडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल उरवणे, प्रा. नंदकुमार सागर, महेश राऊत ,सागर जगताप यांनी तर प्रदीप पोमण यांनी आभार मानले.

       चंदुकाकांच्या स्मृती जपत संजयला जपा.         

               चंदूकाकांचे व्यक्तिमत्व राजहंसाप्रमाणे होते. परिस्थितीवर मात करून शेकडो संस्था उभ्या करण्याचे त्यांचे रेकॉर्ड ठरेल.काकांच्या कामांचा वारसा समर्थपणे राजेंद्र जगताप व आमदार संजय जगताप पुढे घेऊन जात आहेत.त्यांचे भवितव्य चांगले असून एक कष्टाळू आमदार पुरंदरला मिळाला आहे.त्यांना जपण्याचे आणि वाढवण्याचे काम सर्वांनी करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महसूलमंत्री थोरात याप्रसंगी म्हणाले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies