पालखीतळा समोरील रस्त्यासाठी एक कोटीचा निधी मंजुर : उपसरपंच राजेश काकडे यांची माहिती

  पालखीतळा समोरील रस्त्यासाठी एक कोटीचा निधी मंजुर

: उपसरपंच राजेश काकडे यांची माहिती



  नीरा दि.७


    नीरा ( ता. पुरंदर) येथील पालखीतळाच्या समोरील खड्डा बुजवून तो रस्ता चांगला करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार संजय जगताप यांच्या पुढाकाराने एक कोटीचा निधी मंजूर झाला असून येत्या २२ तारखे पूर्वी तो रस्ता पूर्ण होईल अशी माहिती निरेचे उपसरपंच राजेश काकडे यांनी दिली आहे.


  नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज दिनांक ७ जून रोजी ग्रामपंचायतीच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे ,उपसरपंच राजेश काकडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी काकडे म्हणाले की, नीरा शहरात विविध विकास कामे करण्यात येत आहेत. मात्र काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती देत आहेत. ग्रामपंचायतीने पाठ पुरावा केल्यानंतरच कामे मंजुर होत असतात.कोणीही मी पत्र दिलं म्हणून काम झालं म्हणून ठीमकी मिळवण्याची गरज नाही.कारण या कामांसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मगणीं केली तेव्हाच ती कामे मंजूर होत असतात.



  नीरा- शिवतक्रारवाडी हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झाला आहे.भाईच्या मळ्यातील रस्ता देखील मुख्यमंत्री सडक योजनेतून करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव देण्यात आला आहे. पालखी तळाची जागा ग्रामपंचायतीकडे देण्यात आली तर त्याची देखभाल दुरुस्ती आपण करू शकतो.त्याच बरोबर पालखी तळापासून रेल्वे पुला पर्यंतचा घाटाचे कामही लवकरच मंजूर होणार आहे.त्याठिकाणी चौपाटी बनवण्यात येणार आहे. त्याचा लोकांना चांगला उपयोग होईल 

         पिण्याच्या पिण्याच्या पाण्याबाबत बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रीय जलजीवन मिशनच्या माध्यमातून नवीन पणी पुरवठा योजना आपण करीत आहोत. नदी ऐवजी कॅनॉलच्या पाण्यावर नवीन योजना करण्यात येणार आहे. त्यामुळे अशुद्ध पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. नीरा शहरास पंचेचाळीस दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आपण करणार आहोत.निरेतील लोकांना २४ तास मीटर लावून पाणी उपलब्ध करून देणार आहोत.असेही ते म्हणाले.


   मराठी शाळेस निधी देण्याचे पालक मंत्र्यांचे आश्वासन

  नीरा येथील प्राथमिक शाळेचे निम्मे काम पूर्ण झाले आहे.परंतु आणखी आडीच कोटीचा निधी आपेक्षित आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही रक्कम देण्याचे मान्य केले आहे.तोही निधी लवकरच मिळणार आसून शाळेचे सर्व काम लवकरच पूर्ण होणार आहे.त्यामूळे लोकांनी कोणतीही शंका मनात ठेऊ नये.असा विश्वास त्यांनी पालकांना दिला आहे.


डोंबारी समाजाचे पुनर्वसन करणार.


   रेल्वेने डोंबारी समाजाची घरे पडल्या नंतर नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनावर टीका केली होती.मात्र रेल्वे प्रशासनाने याबाबत आमचे कोणाचेही एकूण घेतले नाही.पण या लोकांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही.आमदार संजय जगताप व खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्यातून लवकरच या लोकांचे पुनर्वसन केले जाणार आहे.शेजारील गावातील गायारान जागेत या लोकांना जागा मिळण्यासाठी चा प्रस्ताव जिल्हा अधिकारी यांच्याकडे दिला असल्याचे उपसरपंच राजेश काकडे म्हणाले.



विरोधकांवर टीका 


  आजच्या पत्रकार परिषदेत राजेश काकडे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली .ते म्हणाले की,पाच वर्षात त्यांना विकास कामे करता आली नाहीत.मात्र आता आम्ही मंजूर केलेल्या कामाचे श्रेयलाटण्यासाठी विरोधक प्रयत्न करतात. कामे मंजूर झाल्यावर आम्हीच पत्र दिलं अस म्हणत विरोधक सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचा प्रचार करीत आहोत.मात्र त्यानंही लवकरच चोख उत्तर दिलं जाईल असे काकडे म्हणाले.



Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..