Type Here to Get Search Results !

सासवड शहरातील गुंड अतिश दळवी यास 2 वर्षाकरिता केले पुणे जिल्ह्यातून तडीपार’’

 सासवड शहरातील गुंड अतिश दळवी यास दोन वर्षाकरिता केले पुणे जिल्ह्यातून तडीपार’’



 सासवड दि.६


          सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील गुंड अतिश दळवी, यास पुणे पोलिसांनी दोन वर्षा साठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आले आहे. याबाबतची माहिती सासवड पोलिसांनी दिली आहे.



  गेले पाच वर्शापासुन गुंड अतिश दळवी हा गुंडगिरी करून सासवड शरात व परीसरात वेगवेगळया प्रकारे दहशत माजवत असल्याने तसेच त्याचे वर्तनात कसलाही बदल होत नसल्याने सार्वजनिक शांततेचा भंग होवुन सार्वजनीक मालमत्ता व लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होत असल्याचे दिसुन येत असल्याने त्याचे गुन्हेगारी कृत्यास आळा बसविण्यासाठी, तसेच सामान्य जनतेला होत असलेल्या त्रासातुन प्रतिबंध व्हावा म्हणुन उप.विभागिय पोलीस अधीकारी भोर विभाग सासवड. धनंजय पाटील यांचे आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक आण्णासाहेब घोलप सासवड पोलीस स्टेशन यांनी गुंड अतिश दळवी यास पुणे शहर व पुणे जिल्हयातुन तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव दौंड पुरंदरचे उपविभिय दंडाधिकारी प्रमोद गायकवाड, यांचेकडे सादर केला होता. त्याची सुनावणी झाल्यानंतर प्रमोद गायकवाड, यांनी गुंड अतिश पांडुरंग दळवी, रा, जेजुरी नाका, सासवड, ता.पुरंदर, जि.पुणे यांस मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 56(ब) अन्वये आदेश बजावले पासुन पुणे शहर व पुणे जिल्हयातुन 2 वर्षा करीता हददपार/तडीपार करण्याचे आदेश दिले आहे. आदेशाप्रमाणे गुंड अतिश पांडुरंग दळवी यांस सावड पोलीस स्टेशनकडील पोलीस नाईक गणेश पोटे, निलेश जाधव, सुहास लाटणे यांनी पुणे जिल्हयाचे हददीबाहेर सोडलेले आहे तडीपार गुंड नामे अतिश पांडुरंग दळवी हा पुणे जिल्हयाचे सिमेत कोणास दिसल्यास तात्काळ सासवड पोलीस स्टेशनला संपर्क करावा. असे आवाहन सासवड पोलिसांनी केले आहे.





कोणते गुन्हे केले आहेत दळविने 


    सासवड (ता.पुरंदर) येथे राहणारा अतिश दळवी, गेल्या पाच वर्षापासून सासवड आणि परिसरात गुंडगिरी करून वेगवेगळया प्रकारे दहशत माजवत आहे. 

  1) मार्च 2018 मध्ये एक इसम खळद गावच्या रोडच्या कडेला उभे असतांन गुंड अतिश दळवी याने मोटार सायलवर येवुन खोऱ्याच्या दांडक्याने मारहाण केली होती. त्यात ते जखमी झाले त्याबाबत सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. 


  


  2)एप्रिल/2018 मध्ये सोनोरी रोड, सासवड येथे राहाणारे इसमास किरकोळ भांडणाच्या कारणावरून गुंड अतिश दळवी हा त्याचे 15 ते 20 सहकाऱ्यांना घेवुन यांच्या घरी जावुन त्यांना जबरदस्ती गाडीवर बसवुन जातीवाचक शिव्या देत. तुम्हाला लई माज आला आहे, तुम्हाला सासवडमध्ये राहु देणार नाही असे बोलुन हाताने व लाथबुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली त्याबाबत सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. 


3)नोव्हेंबर/2019 मध्ये तक्रारदार व त्यांचे सहकारी हे त्यांचे महिंद्रा स्काॅर्पिओमध्ये जेजुरी दर्शन करून येतांना मित्राच्या घरी जेवणासाठी थांबले तेव्हा गुंड अतिश दळवी हा मोटार सायकल व होंडा सिटी गाडीमध्ये त्याचे 8 ते 10 सहकाऱ्यांना घेवुन तक्रारदार व त्यांचे सहकारी यांचे गाडीला वेडा घालुन लोखंडी कोयते व दांडक्यांनी गाडीवर मारून काचा फोडुन बाॅनेटवर दांडके मारून खाली उतरवुन तक्रारदार यांचेवर लोखंडी कोयत्याने वार करून दांडक्यांनी मारहाण करून गाडीतील 1,50,000/- रूपये तसेच तक्रारदार यांचे गळयातील सोन्याची चैन जबरदस्तीने काढुन घेवुन गेले त्याबाबत सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. 


4)मे/2021 मध्ये गोपनीय बातमीदाराने बातमी दिली नुसार , सासवड शहरातील गुंड अतिश दळवी हा जेजुरीनाका येथे गावठी हाथभटटीची दारू विकत असल्याची माहिती मिळाली होती व लोकांना व्यसनाधिन करीत होता. त्यावेळी पोलीस स्टाफने जावुन खात्री केली तेव्हा तो व कामगार दारूच्या मालासह मिळुन आले त्याबाबत सासवड पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे दाखल आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies