Type Here to Get Search Results !

शिवतारे यांच्या स्वीय सहाय्यका कडून पत्रकारांची बदनामी

 शिवतारे यांच्या स्वीय सहाय्यका कडून पत्रकारांची बदनामी

 सासवड पोलिसात फिर्याद दाखल



सासवड दि.८



   माजी मंत्री शिवतारे यांचा स्वीय सहाय्यक म्हणून तालुक्याला परिचित असणारे माणिक निंबाळकर यांच्यावर सासवड पोलीस ठाण्यात पत्रकाराची बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पत्रकार निलेश जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीची दखल घेत पोलिसांनी ही पाऊले उचलल्याचे पोलिसांच्या या भूमिकेचे पत्रकार संघटनांनी स्वागत केले आहे.

   पत्रकार म्हटले की वास्तवाता आणि पारदर्शक लिखाण यांमुळे समाजातील अनेक बडे प्रस्थ पत्रकारांचे शत्रू बनत असतात. पुरंदर तालुक्यातील पत्रकारांनी शिवतारे यांच्या भोंगळ कारभाराच्या बाबत आवाज उठवल्याने त्यांचे स्वीय सहायक निंबाळकर यांनी जगताप यांच्यावर आगपाखड करायला सुरुवात केली होती. सोशल मीडियावर पत्रकार हरवले आहेत , जागतिक कीर्तीचे नोबेल पुरस्काराचे पत्रकार !, पुरंदर भूषण पत्रकार अशा उपमा देत निलेश जगताप व प्रदीप जगताप यांच्या नावानिशी व फोटोसाहित पोस्ट व्हायरल केल्याने जगताप यांनी पोलिसांकडे दाद मागितली. यावर माणिक निंबाळकर यांच्यावर भारतीय दंडविधान कायदा 1860 च्या कलम 501 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

पत्रकारांना हवे संरक्षण-


पत्रकारांवर होणारे हल्ले रोखणे, त्यांना सन्मानाची वागणूक देणे यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी काळाची गरज बनली आहे. स्वतःचे अस्तित्व पणाला लावून सेवा करणाऱ्या पत्रकारांची बदनामी करणाऱ्यांना वठणीवर आणायला हवे असे मत प्रसिद्धिप्रमुख भरत निगडे यांनी व्यक्त केले.



आम्ही न्यायालयात जाणार -

बदनामी केल्याने आम्ही व्यथित झालो असून अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत. परंतु, त्याचबरोबर मंत्रिपदाच्या काळात निंबाळकर याने केलेले गोरज धंदे बाहेर आणणार असून पोलीस अधीक्षकांनी आम्हाला मोफत सुरक्षा पुरवावी.


निलेश जगताप


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies