महाराष्ट्र दिनी नीरा ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करण्यात आले कर्मचार्यांच्या हस्ते.
नीरा दि.१
आज एक मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायतीचे वरीष्ठ लिपिक गणिभाई सय्यद व कनिष्ठ लिपिक सचिन ठोंबरे यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आल्याने ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.
पुणे जिल्ह्यासह पुरंदर तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या नीरा ग्रामपंचायतीत मागील वर्षी सत्तांतर झाल्यानंतर सरपंचपदी तेजश्री काकडे, तर उपसरपंचपदी राजेश काकडे यांनी पदभार स्विकारला, त्यानंतर प्रत्येक राष्ट्रीय सणाला ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ध्वजारोहण करत असतं. आज रविवार दि.१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना ध्वजारोहण करण्याचा मान देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार सकाळी आठ वाजता ग्रामपंचायतीचे जेष्ठ कर्मचारी गणिभाई सय्यद व सचिन ठोंबरे यांच्या हस्ते ध्वजसस्थंभाचे पुजन करत ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नाना जोशी, ग्रामपंचायत सदस्य राधा माने, वैशाली काळे, माधुरी वाडेकर, अभिषेक भालेराव, माजी उपसरपंच दिपक काकडे, विजय शिंदे, टी.के. जगताप, ग्रामसेवक मनोज डेरे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी लक्षमण जाधव, राहुल झुंझार, अविनाश माने, वैशाली पाथरकर, शकंतूला पाटोळे, मंगल राखपसरे,बबीता राखपसरे आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या झेंड्याची दोरी आपल्या सहकार्यांच्या हाती पाहुन इतर सर्व कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले.