पिंगोरी येथे महिलांना देण्यात आली गॅस सुरक्षा संदर्भात माहिती

 पिंगोरी येथे महिलांना देण्यात आली गॅस सुरक्षा संदर्भात माहिती

 


नीरा दि.१

    केंद्र सरकारच्यावतीने या महिन्यात गॅस सुरक्षा सप्ताह पाण्यात येत आहे.त्यानिमित्त पिंगोरी येथे महिलांना एल पी जी गॅस वापरताना कोणती काळजी घ्यायची,त्याचबरोबर गॅस लिकीज झाल्यास कोणत्या उपाय योजना करायच्या याबादलाची माहिती जेजुरी येथील शहीद शंकर शिंदे गॅस एजंसीच्यावतीने देण्यात आली.


   देशात सर्वत्र आता स्वयंपाकासाठी एल पी जी गॅस वापरला जातो.मात्र तो गॅस कसा वापरायचा त्याचे नियम काय आहेत? दुर्घटना झाल्यास विम्याच्या कोणत्या योजना आहेत याबाबतची माहिती एजन्सीचे चंद्रकांत नलावडे यांनी दिली यावेळी पिंगोरीचे सरपंच जीवन शिंदे,उपसरपंच प्रकाश शिंदे,पोलीस पाटील राहुल शिंदे,सदस्य संदीप यादव एजन्सीचे चालक रणजित शिंदे, ग्रामास्त वसंत शिंदे,निलेश शिंदे,दत्तराजे शिंदे,लक्ष्मण शिंदे,हरिश्चंद्र यादव , प्रवीण गायकवाड, मिलिंद यादव, गोरख शिंदे,सचिन शिंदे,आदीसह महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   यावेळी सिलेंडर व त्यामध्ये असलेल्या गॅस बाबत माहिती देण्यात आली. सिलेंडरची जोडणी कशी करायची, कोणत्या ठिकाणी लिकेज होऊ शकते. व लीकेज झाल्यावर कोणत्या उपाय योजना करायच्या याबाबतची माहिती देण्यात आली त्याच बरोबर याबाबत असलेला विमा व तो मिळवण्यासाठी काय करायचे याबाबत माहिती देण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?