हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध; श्रीकांत बोरावके अध्यक्ष, अर्जुन मेदनकर कार्याध्यक्ष
हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध; श्रीकांत बोरावके अध्यक्ष, अर्जुन मेदनकर कार्याध्यक्ष
आळंदी :
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई तथा पुणे जिल्हा पत्रकार संघ संचलित हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ, खेड या संघाची द्विवार्षिक निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी श्रीकांत बोरावके तर कार्याध्यक्षपदी अर्जुन मेदनकर यांची निवड जाहीर करण्यात आली. नूतन कार्यकारिणीत एकूण २५ सदस्यांचा समावेश करण्यात आला असून पत्रकार बांधवांकडून नव्या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुल शिंदे तर सह निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भरत निगडे यांनी निवड जाहीर करून नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
ही निवडणूक आळंदी-मोशी रोडवरील डूडूळगाव येथील दीप बँक्वेट हॉलमध्ये पार पडली. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, परिषद अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, प्रतिनिधी एम. जी. शेलार, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर व उपाध्यक्ष हनुमंत देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संघटनेतील ज्येष्ठ हनुमंत देवकर, हरिदास कड, संजय बोथरा, कल्पेश भोई यांनीनी मध्यस्थी करत एकमताचा मार्ग स्वीकारला. मावळते अध्यक्ष अर्जुन मेदनकर व श्रीकांत बोरावके यांनी संघटनेच्या हितासाठी सकारात्मक भूमिका घेत सहमती दर्शविली. परिणामी अध्यक्षपदी बोरावके तर कार्याध्यक्षपदी मेदनकर यांची निवड सर्वसंमतीने झाली.
यावेळी संघटनेचे सदस्य, ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या कार्यकारिणीकडून पत्रकारांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम होईल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष : श्रीकांत बारावके
कार्याध्यक्ष : अर्जुन मेदनकर
उपाध्यक्ष : गौतम पाटोळे, संजय बोरकर, अविनाश राळे
सचिव : विवेक बच्चे
सहसचिव : रोहिदास कदम
खजिनदार : योगेश गायकवाड
सहखजिनदार : सुनिल बटवाल
प्रसिद्धी प्रमुख : अनिल जोगदंड
कार्यकारिणी सदस्य :
प्रसन्नकुमार देवकर, आतिश मेटे, बद्रीनाथ घुगे, सोमनाथ बेंढाले, कृष्णा आवटे, योगेश जाधव, गोविंद ठाकूर तौर, बाबासाहेब भंडारे, राजेश नागरे, भागवत काटकर, प्रमोद भळगट.
ज्येष्ठ सल्लागार :
हनुमंत देवकर, हरिदास कड, संजय बोथरा, कल्पेश भोई.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा