नीरेच्या शिरपेचात मानाचा तुरा
इंडिया बुलिअन ज्वेलर्सचे असोसिएशनच्या संचालकपदी अमृतराज मालेगांवकर.पुरंदर :
पुरंदर तालुक्यातील मुख्य बाजारपेठेचे गाव असलेल्या निरा येथील अमृत ज्वेलर्सचे प्रोप्रायटर अमृतराज मालेगांवकर यांची इंडिया बुलिअन ज्वेलर्सचे असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र संचालक पदी नियुक्ती झाली आहे. मालेगांवकर यांचे पुणे सातारा सोलापूर जिल्ह्यासह निरा व परिसरातील सराफ - सुवर्णकार व्यवसायीकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आय.बी.जे.ए. ही १०२ वर्ष जुनी संस्था आहे. आणि भारत सरकार व पी.एम.ओ कार्यालय यांची एक सल्लागार समिती (सोने व चांदी व्यापार) मध्ये सुद्धा महत्वाची भूमिका बजावते. या शिवाय दररोज भारतातील सोने - चांदीचे दर देखील आय.बी.जे.ए. ठरवते. अशा या संस्थेच्या संचालक पदावर निरेतील अमृतराज मालेगांवकर यांना करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
मालेगांवकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला असता, इंडिया बुलिअन ज्वेलर्सचे असोसिएशनच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. सराफ - सुवर्णकार व्यवसायातील काही महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, व्यवसायिकांच्या हितासाठी माझ्या पदाचा नक्की उपयोग होईल याची मला खात्री आहे.