इंधन दर कपातीवर शरद पवार काय म्हणाले?...
केंद्र सरकारने सामान्यांना दिलासा देत इंधन दरांबाबत मोठा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात करण्याची घोषणा काल केली होती, त्यामुळे महागाईच्या काळात काहीसा दिलासा मिळणार आहे.
या दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. "काही ही नसल्यापेक्षा बरं आहे, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रति लिटरनं कमी करण्याची घोषणा केलीय. यासोबतच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानही जाहीर करण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केलं आहे.